*दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान* नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर रवाना झाले. आज 23 जानेवारीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभ होत आहे. त्यासाठी ते नांदेड विमानतळावर आले होते. दुपारी ३ वाजता ते मुंबईला परत प्रयाण करणार आहेत. विमानतळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,आमदार डॉ. तुषार राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 2,010 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पळवून नेलेल्या 8 वर्षीय बालिकेचा नरबळी दिला जाणार होता पती-पत्नीने मिळून 7 लाख 50 हजारांची केली फसवणूक