नांदेड :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या 23 जानेवारी 2025 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभासाठी येत आहेत. ते नांदेड विमानतळावरून सकाळी 11 वा. परभणीला प्रयाण करतील. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या सकाळी 9.40 वा. मुंबई येथून नांदेडकरीता निघतील. नांदेडला सकाळी 11 वा. पोहचल्यानंतर हेलिकॉप्टरने ते परभणी विद्यापिठाच्या हेलिपॅडसाठी रवाना होतील. सकाळी 11.35 वा. विद्यापीठ हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. दुपारी 12 वा. ते दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वा. ते परभणी विद्यापीठाच्या हेलिपॅडवरून नांदेडकडे प्रयाण करतील. नांदेड विमानतळ येथे दुपारी 2.55 वा. आगमन झाल्यानंतर लगेच दुपारी 3 वाजेच्यासुमारास ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 815 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थाद्वारे रोडसेफ्टी व अपघात रोखण्यासाठी मोफत रेडियम मोहीम- डॉ पठाण 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा राज मॉलमध्ये खून