आज जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार नांदेड :- महाराष्ट्रात महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिंम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी 2025 हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी 4 वाजता पिपल्स कॉलेज मैदान, जिल्हा क्रीडा संकुल नांदेड व जिल्ह्यातील विविध शाळा येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरीची दखल घेवून जिल्ह्यातील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील खेळाडूं, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हृयात दरवर्षी 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेचे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन 1952 मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलिंपिंक स्पर्धेत स्वंतत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिपिंक पदक कास्य पदक जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे होत होती. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री यांनी ऑलिंपिंकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,169 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेची जय्यत तयारी “ बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय