नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ.सुखविंदरसिंह यांनी राज्यातील 48 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात मुंबई शहरात 21 पोलीस निरिक्षक आले आहेत. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात 7 पोलीस निरिक्षक पाठविण्यात आले आहेत. नवी मुंबई येथे दोन पाठविण्यात आले आहेत. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये 15 पोलीस निरिक्षक पाठविले आहेत. मुंबई शहरातून इतर विभागांमध्ये 3 पोलीस निरिक्षक गेले आहेत.
सन 2024 च्या शेवटच्या दिवशी जारी झालेल्या आदेशात मुंबई शहरात आलेले 21 पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. पोपट निवृत्ती आव्हाड-पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, पंढरीनाथ रामचंद्र सावंत-नाशिक ग्रामीण, संजय मनाजी पोपळघट, विकास महादेव म्हामुनकर-गुन्हे अन्वेषण विभाग, रईस महम्मद नजिर शेख-दहशतवाद विरोधी पथक, प्रकाश वसंत पवार-रायगड, अनिल पोपटराव हिरे, तुकाराम शंकर कोयंडे-नागपुर शहर, राणी लक्ष्मण पुरी-पुणे शहर, अनिल मारोती मुळे, विलास काशिनाथ राठोड, विशाल एकनाथ चंदनशिवे, विशाल विठ्ठल गायकवाड, दिलीप रामा मसराम, प्रसाद शंकर वागरे, सदाशिव तुकाराम सावंत-विशेष सुरक्षा विभाग, मनोहर दौलतराव पवार-नवी मुंबई, शिवाजी माणिकराव पासलकर-नाशिक शहर, नागु नारायण उगले-वर्धा.
मुंबई शहरातून मिरा-भाईंदर-वसई-विरार या पोलीस आयुक्तालयात पाठविलेले पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. संजय दत्तु हजारे, जितेंद्र बोदप्पा वनकोटी, राजेंद्र गणपत कांबळे, चंद्रकांत सुधाकर सरोदे, विकास सखाराम सुपे, दिलीप हरीभाऊ राख, सुधीर निवृत्ती गवळी, मुंबई शहरातून नवी मुंबई येथे गेलेले पोलीस निरिक्षक श्रीकांत रेवणसिध्द धरणे, माणिक दामोधर नलावडे हे आहेत.
मुंबई शहरातून विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठविलेले 15 पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. मिनाक्षी मनोज रोहरा, श्रीकांत गुणवंत आदाटे, अरविंद वसंत पाटील, भास्कर अर्जुन पवार- मरोळ. शिरीष बबनराव शिंदे, कैलास नामदेव राऊत, सुनिल अर्जुन गोसावी, हनुमंत रामचंद्र गायकवाड-नानवीज, दत्तात्रय गोविंद कोळेकर, गजानन महादेव बनसोडे, सुशांत मधुकर वराळे-सोलापूर. नैना शेखर पोहेकर, शेख रहिम शेख गफार-अकोला, देवयानी शामराव पाटील-धुळे, रामदास विठ्ठल शेवते-खंडाळा असे आहेत. मुंबई शहरातून सुनिता संदीप नवले आणि दिलीप बाळु तळपे या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागात पाठविण्यात आले आहे. तसेच पुष्पलता संपतराव मंडले यांना नागरी हक्क विभागात नियुक्ती दिली आहे.
राज्यात 48 पोलीस निरिक्षकांना वर्षाच्या शेवटच्या दिवशी नवीन नियुक्त्या
