नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात मागील पन्नासाहुन अधिक वर्षापासून सुरु असलेली श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट सोमवार दि. 30 डिसेम्बर रोजी सुरु होत आहेत. खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर होणाऱ्या या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वाराचे मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मीत ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, गुरुद्वारा श्री लंगरसाहेबचे मुखी संत बाबा नरिंदरसिंघजी, मुखी संत बाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा माता साहेबचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. राजदेविंदरसिंघ कल्लाह यांची उपस्थिती राहणार आहे. सुरुवातीला हॉकी इंडियाच्या नियमानुसार साखळी सामने खेळविले जाईल. त्यानंतर गुणतलिकेत आघाडी मिलावणाऱ्या संघात बाद फेरीचे सामने होईल. अशी माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ व हॉकी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे दिली आहे. यंदाची ही स्पर्धा 51 वीं असून देशपातळी वरील सोळा संघ त्यात सहभागी होणार आहेत. यात पूल ए मध्ये आर्मी इलेवन जालंधर, बिलासपुर रेल्वे, यूनियन बैंक मुंबई आणी चार साहबजादे हॉकी क्लब नांदेड. बी पूल मध्ये कस्टम मुंबई, एमपीटी मुंबई, एनडीएसएफ इस्लामपुर आणी साईं एक्सेलेंसी छत्रपति संभाजी नगर खेळणार आहे. तर पूल सी मध्ये ए. जी. नागपुर, ऑरेंज सिटी नागपुर, पीएसपीसीएल पटिआला आणी सुफियाना हॉकी क्लब अमरावती यांच्यात खेळ रंगेल. चौथ्या डी पूल मध्ये बीएसएफ जालंधर, ए. जी. हैदराबाद, एसजीपीसी अमृतसर आणी खालसा यूथ क्लब नांदेड मध्ये साखळी सामने खेळले जाईल. वरील सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन हॉकी आयोजन समेती तर्फे करण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 761 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्या माळेगावच्या यात्रेला प्रारंभ;उद्या देवस्वारी व पालखी पूजन नरेंद्र मोदी यांनी डॉ.मनमोहनसिंघ यांच्या अंतिमक्रियेला जागा दिली नाही त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे