नांदेड – आनंद नगर भागात बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आगीचा तांडव पाहावयास मिळाला आगी मध्ये हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी व ऑईल शोरूम जळाली आहे. अग्निशमन दल पोहोचण्यास काही काळ उशीर झाला असतां तर आगीच्या तांडवात सापडलेल्या हॉस्टेलच्या 70 मुलींचे प्राण धोक्यात आले असते. आनंदनगर भागात सकाळी पाच वाजेच्या दरम्यान नैवेद्यम हॉटेल आणि जीव्हीसी मोबाईल शॉपीला आग लागली. या आगीने रौद्र रुप धारण केले. यात नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेललाही आगीच्या तावडीत इमारतीच्या डाव्या बाजूस असलेल्या जीव्हीसी मोबाईल शॉपीपर्यंत आग पोहोचली. त्यात मोबाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर जळाले. मोबाईल शॉपीच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मी ऑईल शोरूम हे मोठे दुकान होते. या दुकानाचेही शटर व समोरील सिलिंग आगीमध्ये जळाली. नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच एम.एच. २६ सीएच १४७९ क्रमांकाच्या बंबासह अग्निशमन अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. ही आग विझवत असताना हॉटेल नैवेद्यमवरील वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेलमधून तब्बल ७० मुलींची तातडीने सुखरूप सुटका करण्यात आली. ही आग कश्यामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. Kanthak Suryatal Post Views: 2,089 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महामानवाच्या अभिवादनासाठी नांदेडहून मुंबईला विशेष रेल्वे सुटणार : प्रा. राजू सोनसळे यांच्या मागणीला यश विदर्भातील दोन गावांमध्ये नागरिक घेणार मतदान पत्रिकेवर मतदान आणि तपासणी करणार राजीव कुमारच्या मशीन सोबत