नांदेड(प्रतिनिधी) -कंधार तालुक्यात शेकापूर शिवारातील मन्याड नदीपात्रात 20-22 वयोगटाच्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला आहे. कंधार पोलीसांनी या अनोळखी मयताबाबत काही माहिती असेल तर कंधार पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शेकापुर येथील पोलीस पाटील धोंडीबा विठ्ठल शिवले यांनी दिलेल्या खबरीनुसार 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्यासुमारास शेकापुरजवळील मन्याड नदीपात्रात एक 20-22 वयोगटाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह आहे. कंधार पोलीसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यू क्रमांक 58/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक खजे यांच्याकडे देण्यात आला आहे. कंधार पोलीसांनी जारी केलेल्या माहितीनुसार या अनोळखी मयत युवकाचे वय 20-22 वर्ष असेल. त्याचा रंग गोरा आहे. त्याची उंची 5 फुट 5 इंच आहे. त्याने आपल्या शरीरावर आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट आणि कॉफी रंगाची अंतरवस्त्र परिधान केलेली आहेत. त्यांच्या कंबरेला लाल रंगाचा करदोडा बांधलेला आहे. त्याचा बांधा सडपातळ आहे. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ आई असे शब्द गोंदवलेले आहेत. कंधारचे सहाय्यक पोलीस निरिक्षक खजे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मयत अनोळखी व्यक्ती बाबत कोणास काही माहिती असेल तर त्यांनी कंधार पोलीसांशी संपर्क साधावा किंवा त्यांचा मोबाईल क्रमंाक 7796074437 वर संपर्क साधून माहिती द्यावी. Kanthak Suryatal Post Views: 853 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाहेगाव-भनगी गावात सापडलेली वाळू अंदाजे फक्त 80 ब्रास ; महसुल विभागाला वाळू माफियाविरुध्द कार्यवाही करण्यात रस नाही 14 वर्ष 11 महिन्याच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे दोघे गजाआड