नांदेड(प्रतिनिधी)-2002 मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील तीन जणांना झालेली शिक्षा रद्द करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी 22 वर्षानंतर त्यांची सुटका केली आहे.
सन 2002 मध्ये नांदेड जिल्हा परिषदे कार्यरत शिक्षणाधिकारी चित्तप्रकाश देशमुख यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेना नेते प्रकाश मारावार, सभापती मोतीराम पाटील, शिवाजी सुर्यवंशी या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 363 आणि 342 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात प्राथमिक न्यायालयाने या तिघांना तिन महिन्याच्या कैदेची शिक्षा ठोठवली होती. शिवसेना स्टाईलने प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांनी तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी चित्तप्रकाश देशमुख यांना गराडा घालून शिक्षक बदली प्रकरणी जाब विचारला होता. प्राथमिक न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात अपील क्रमांक 86/2015 दाखल करण्यात आले. या खटल्यात प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांच्यावतीने ऍड. आर.जी. परळकर, ऍड. नंदकिशोर कल्याणी मुगटकर यांनी बाजू मांडली. युक्तीवादानंतर न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांना प्राथमिक न्यायालयाने दिलेली तीन महिने कैदेची शिक्षा रद्द करून 22 वर्षापुर्वी घडलेल्या प्रकरणातून मुक्तता केली.
22 वर्षापुर्वीच्या अपहरण प्रकरणातून प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांची जिल्हा न्यायालयाने केली मुक्तता
