नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील एका दबंग आणि मजबुत पोलीस अंमलदाराने आपल्या जीवाची परवा न करता एका तलवारधारी युवकाला पकडून जनतेत पसरलेली भिती या उत्कृष्ट कामासाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस अंमलदार बालाजी तेलंग यांचा सन्मान केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असणारे दबंग पोलीस अंमलदार बालाजी तेलंग हे स्थानिक गुन्हा शाखेत अनेक कामे करतात. दि.5 ऑक्टोबर रोजी दुपारी जेवनासाठी ते आपल्या घरी जात असतांना श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर एक युवक हातात उघडी तलवार घेवून दहशत पसरवित होता. त्यामुळे अनेक दुकानदारांनी आपल्या दुकाने बंद केले. रस्त्यावर चालणारे नागरीक, महिला, युवक, युवती दुकानांच्या कडे-कडेने चालत रस्ता पार करत होते. त्यावेळी बालाजी तेलंग आपल्या घरी जात असतांना त्यांनी शस्त्रधारी युवक पसरवत असलेली दहशत पाहिली आणि ते थांबले आपली दुचाकी बाजूला लावली आणि त्या युवकाकडे पळत जाऊन त्याच्या ज्या हातात तलवार होती. तो हात घट्ट पकडला आणि दुसऱ्या हाताने त्या शस्त्रधारी युवकाची मानगुट पकडली. त्या शस्त्रधारी युवकासोबत असलेले दोन दुसरे युवक पळून गेले. परंतू बालाजी तेलंगने आपली घट्ट असलेली पकड सैल जावू दिली नाही. त्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलीसांनी बोलावून तो शस्त्रधारी युवक त्यांच्या स्वाधीन केला. त्या युवकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 493/2024 दाखल केला आहे.
पोलीस दलात भरती झाले तेंव्हा बालाजी तेलंगने घेतलेली सर्वसामान्यांच्या नागरीकांच्या जीवत व वित्त रक्षणाची शपथ पुर्ण करतांना त्याच्या हातातील शस्त्र आपल्या शरिरावर कुठे जखम करू शकते. या भितीला बाजूला ठेवले होते आणि त्या शस्त्रधारी युवकाची घट्ट पकडल त्यांच्या मजबुत पणाने सैल झाली नाही. बालाजी तेलंगच्या या कामगिरीनेच जनतेला पोलीस असल्याची प्रचिती आली आणि तेच आपले रक्षण करु शकतात याचा विश्र्वास आला. बालाजी तेलंगने केलेल्या कामगिरीची प्रशंसला केली नाही तर आमच्या लेखणीतील धार कमी झाली असे आम्हालाच वाटेल. आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी बालाजी तेलंगचा सन्मान केला आणि भविष्यात सुध्दा अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस अधिक्षकांचे स्वियसहाय्यक वडजे यांची उपस्थिती होती. बालाजी तेलंगने त्या शस्त्रधारी युवकाची मानगुट आणि हात पकडल्यानंतर त्या ठिकाणी वावरणाऱ्या जनतेतील युवकांनी तरी बालाजी तेलंगला मदत करायला हवी होती.पण तसे प्राप्त असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत नाही. हे दुर्देवाने नमुद करावे वाटते.
बालाजी तेलंग हे आपल्या घरी जेवणासाठी जात होते. पण आपल्यासमोर घडणारा प्रसंग सोडून पळून गेले नाहीत. नाही तर याच स्थानिक गुन्हा शाखेत 1200 मोदकांचा प्रसाद अर्पण करून येथे आलो आहे असे म्हणणारे महाभाग पोलीस अंमलदार सुध्दा आहेत. तसेच गेली 17 वर्ष याच शाखेत कार्यरत असणारे पोलीस अंमलदार मी या जिल्ह्याचा कारभार चालू शकतो अशा अर्विरभावात वावरतात. फक्त भिंत बदलून नवीन नियुक्ती घेणारे पोलीस अंमलदार सुध्दा आजही स्थानिक गुन्हा शाखेतच कार्यरत आहेत. कारण 1200 मोदके अर्पण करून आलेल्या पोलीस अंमलदाराला आपल्या मोदकांचा हिशोब त्यांना देवू वाटत नाही. अशा प्रकारच्या बहुरंगांनी रंगलेल्या स्थानिक गुन्हा शाखेत बालाजी तेलंग सुध्दा कार्यरत आहेत.
पोलीस अंमलदार बालाजी तेलंगने दहशत माजविणारा युवक कशप सुनिल हाटकर (24) याने दहशत पसरवितांनाचा आणि बालाजी तेलंगने पकडल्यानंतरचा व्हिडीओ वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत.
एकट्या दबंग पोलीस अंमलदाराने आपला जीव धोक्यात घालून शस्त्रधारी गुंड पकडला
