मिरवणूक व उत्सवादरम्यान लेजर लाईटच्या वापरास प्रतिबंध नांदेड :- जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 3 ऑक्टोंबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यतच्या श्री नवरात्र उत्सव कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्याही व्यक्तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार डॉल्बी सिस्टीमचा वापर करणेस, चालविण्यास तसेच सदर मिरवणूक/उत्सवादरम्यान लेजर लाइटच्या वापरासही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 26 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,180 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा- सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे नांदेड-बिदरसह नांदेड लातूर मार्गाचा सर्व्हे लवकरच-अरुणकुमार जैन