नांदेड :- माजी सैनिक महामंडळ (मेस्को) महाराष्ट्र शासनामार्फत कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील रुग्णालय व आस्थापनेसाठी सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षागार्ड पुरुष, सुरक्षागार्ड महिला यांच्या जागा भरावयाच्या आहेत. माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य व माजी सैनिक विधवा यांच्यातून कंत्राटी पध्दतीने पदे भरण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील पात्रताधारक माजी सैनिक, पाल्य व माजी सैनिक विधवा यांनी तात्काळ कै. शं.च. शासकीय रुग्णालयातील माजी सैनिक महामंडळाचे कार्यालयात सुरक्षा अधिकारी/सुपरवायझर यांच्याशी मोबाईल क्रमांक 7378593708 वर संपर्क करावा, असे आवाहन मेस्को अधिकारी विश्वास लक्ष्मण यांनी केले आहे. 00000 Kanthak Suryatal Post Views: 1,075 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद माहितीअधिकार प्रकरणात तत्परता आवश्यक – डॉ.हाटकर