रस्त्यावरील झाडांच्या चुकीच्या कापणीमुळे वाद

नांदेड(प्रतिनिधी)-आज शहरात लंगर साहिब गुरुद्वाराच्यावतीने लावण्यात आलेल्या झाडांची कापणी करतांना लंगर साहिबजी प्रतिनिधीने यावर आपेक्ष घेत चुकीने तोडणी करू नका. जेथे आवश्यक आहे तेथे जरुर तोडणी करा असा मुद्दा उपस्थित केला.
आज सकाळी ध्वजारोहणानंतर महानगरपालिकेच्यावतीने महाविर चौक ते वजिराबाद चौक या रस्त्यावर लंगर साहिबजी गुरुद्वाराच्यावतीने लावण्यात आलेल्या झाडांची कापणी सुरू होती. ही कापणी सुरू असतांना लंगर साहिबजी गुरुद्वाराचे प्रतिनिधी तेथे आले आणि एवढ्या मेहनतीने लावलेल्या झाडांची कापणी करताना ती कापणी चुकीच्या पध्दतीने होत आहे असा मुद्दा उपस्थित केला. यावर महानगरपालिकेच्यावतीने पालकमंत्री आले आहेत, साहेबांनी सांगितले आहे असे उत्तर देण्यात आले. त्यावेळी लंगर साहिबजींचा प्रतिनिधी कोणत्या तरी साहेबांना फोन लावला आणि त्यांना विचारणा केली की, कोण तज्ञ आहे. ज्याच्या मार्गदर्शनात हे झाडे कापणीचे काम सुरु आहे. पण प्रतिनिधी भरपूर रागात होते. ते सांगत होते की, झाडे कापणी आवश्यकच आहे तर आम्हाला सांगितले तरी आम्ही त्यात मदत करू आणि झाडांच्या झालेल्या कापणीतील लाकडे लंगर साहिबजी गुरुद्वारा येथे पाठविले गेले पाहिजे. प्रतिनिधी सांगत होते अनेक जागी आम्ही झाडांचे पुर्नरोपण करून दिलेले आहे. काही ठिकाणी उपजाऊ झाडे लावली आहेत. तरी पण कोणतीही तज्ञाची मदत घेता वेड्या वाकड्या पध्दतीने झाडांची होणारी कापणी ही चुकीची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!