देगलूर (प्रतिनिधी)– देगलूर पोलिसांनी अवैध पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत सुमारे 5 लाख 5 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 15 मार्च रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पिकअप वाहनाद्वारे अवैध पान मसाला वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून MH 26 BE 1510 क्रमांकाची पिकअप गाडी अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीत विविध प्रकारचा पान मसाला व तंबाखू साठा आढळून आला. या प्रकरणात उपमाराम वेंकट राठोड (वय 35, रा. रामकृष्ण तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून सागर पान मसाला, SR-1 तंबाखू, केशरयुक्त पान मसाला, V-1 टोबॅको तसेच पिकअप वाहन असा एकूण 5,05,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 123, 272, 273, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी शेख गयासोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारोती मुंढे, पोलीस उपनिरीक्षक महाजन म्हैसनवाड तसेच देगलूर पोलीस दलातील पोलिस अमलदार चंद्रकांत भाग्यवंत,किरणकुमार वाघमारे,वैजनाथ मोटरगे,श्रीनिवास चिदमवार,राजवंतसिंघ बुंगई,मल्लू राजमोड यांनी केली. पुढील तपास देगलूर पोलीस करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 957 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत 8 स्वीकृत सदस्य जाहीर; स्थायी समिती व शिक्षण-महिला बालकल्याण समित्यांचीही घोषणा तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न दिल्याने डॉ. सान्वी जेठवाणी नाराज