पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान ज्ञानेश्वर नगर येथील फिर्यादीच्या ट्रेडिंग कंपनी, सिडको नांदेड येथे हा प्रकार घडला. आरोपी फरीद भैया (रा. लखनौ, उत्तर प्रदेश), रघुनंदन गोंडा (रा. उत्तर प्रदेश) व आलोक खरे (रा. उत्तर प्रदेश) यांनी संगनमत करून फिर्यादीकडून तांदूळ होलसेल खरेदी करण्याच्या बहाण्याने बँक ऑफ बडोदा खात्यावर 20 लाख रुपये पाठवले. त्यानंतर आणखी पैसे पाठवण्याची मागणी करत फिर्यादीकडून पुन्हा 10 लाख रुपये मागवून घेतले. मात्र त्यानंतर आरोपींनी तांदूळ न देता तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी सोमनाथ दिनकर मिसाळ (वय 30, रा. पांगरा, ता. आटी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 240/2026 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 316(2), 3(5) तसेच बीएनएस-2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/486 तेलंगे हे करीत आहेत.
More Related Articles
कोलंबीमध्ये 1 लाख 24 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-कोलंबी ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला…
आयपीएस ऋषिकेश शिंदे यांनी अवैध चंदन तस्करांना एका प्रकारे ‘झुकेगा कैसे नही पुष्पा जरूर झुकेगा…’ अशी चेतावणी दिली…
आयपीएस ऋषिकेश शिंदे यांची चंदन तस्करांवर धडाकेबाज कार्यवाही;८.२१ लाखांच्या मुद्देमालासह ७ आरोपी गजाआड बीड – …
धर्माबाद तालुक्यात गांजाची लागवड उघड; १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यातील एका शेतामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून…
