नांदेड,(प्रतिनिधी)-घरातून बाहेर गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह 24 तासानंतर धर्माबाद येथील सिरजखोड पुलाजवळच्या पाण्याच्या डबक्यात सापडला. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. करखेली तालुका धर्माबाद येथील सय्यद सत्तार सय्यद इक्बाल अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सय्यद वसीम सय्यद इकबाल हा 15 सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या पत्नीला धर्माबाद येथे जाऊन येतो असे सांगून घरातून गेला. परंतु तो रात्री परत आलाच नाही 16 सप्टेंबर च्या दुपारी 3 वाजेच्या सुमारास सय्यद वसीम सय्यद इकबाल (27) याचे प्रेत सिरजखोड पुला लगत असलेल्या जुन्या मस्जिदच्या पाठीमागे एका पाण्याच्या टप्प्यात सापडले. त्याच्या डोक्यावर, कपाळावर, शरीरावर, जागोजागी जखमा दिसत आहेत. यावरून हा खून करण्यात आला आहे असे दिसते. धर्माबाद पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा क्रमांक 271/ 2024 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,792 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Types of Peer Pressure: Understanding and Navigating Influence from Others by Chloe White Nov, 2024 गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात श्रीगणेश विसर्जन