नांदेड (प्रतिनिधी)-सोनखेड येथील एक किराणा दुकान फोडून चोरट्याने रोख रक्कम, सिगारेट, जर्दा आणि बीडी बंडल असा एकूण 2 लाख 45 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोनखेड येथील रमेश शंकरराव गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर 1.55 वाजेपासून ते 2.10 वाजेपर्यंत म्हणजे फक्त 15 मिनिटात त्यांच्या किराणा दुकानातील लोखंडी पत्रामधील मागील पत्रे कापून कोणी तरी चोरट्यांनी आत ठेवलेली रोखरक्कम 2 लाख 25 हजार तसेच दोन प्रकारच्या सिगारेट, जर्दा, आणि बीडीची बंडले किंमत 20 हजार 250 रुपयांची असा एकूण 2 लाख 45 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोनखेड पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305(ए) नुसार गुन्हा क्रमांक 163/2024 दाखल केला आहे. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 622 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुखेड तालुक्यात घरफोडले; उमरी तालुक्यात कृषी सेवा केंद्र फोडले; स्वारातीमच्या वस्तीगृहात चोरी विवाहितेला 25 लाखांची मागणी