नांदेड(प्रतिनिधी)-इंस्टाग्रामच्या आयडीवरून प्रभु श्री रामचंद्र, महादेव आणि 33 कोटी देवांचा उल्लेख अत्यंत घाणेरड्या शब्दात करणाऱ्याविरुध्द भोकर पोलीसांनी भारतीय तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. भोकर येथील प्रतिक निळकंठ वर्षवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास त्यांनी इंस्टाग्रॉम अकाऊंट पाहिले असतांना एमआर हिंदु बॉय-001 कट्टर या आयडीवर प्रभु श्री रामचंद्र, महादेव आणि 33 कोटी देव असे लिहुन त्यांच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दात आपल्या त्या आयडीवर उल्लेख केला होता. प्रतिक वर्षवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भोकर पोलीसांनी भारतीय तंत्रज्ञान कायदा कलम 67 आणि भारतीय न्याय संहितेतील कलम 353(2) नुसार गुन्हा क्रमांक 322/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास भोकरचे पोलीस निरिक्षक मारकड हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,687 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दहीहंडीतील अपमानाचा बदला; एक खल्लास दो घायल गेल्या 24 तासात तीन जबरी चोऱ्या, दोन चोऱ्या आणि पाच दुचाकींची चोरी