नांदेड(प्रतिनिधी)-अहमदपुर येथे खून करून ते प्रेत दुचाकीला बांधून नांदेडला आणून जुन्यापुलावरून गोदावरी नदीत फेकणाऱ्या एकाला जनतेने पकडले आहे. वृत्तलिहिपर्यंत पाण्यात फेकलेले प्रेत सापडले नाही. पण प्रेत फेकणारा नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार गणेशचर्तुर्थीची पहाट होण्याअगोदरच्या अंधारात नांदेडच्या जुन्या पुलावरून एका व्यक्तीने एक थैला नदीत फेकला. हा प्रकार एका व्यक्तीने पाहिला आणि त्याने इतरांसोबत थैला फेकणाऱ्याला पकडले. तेंव्हा त्या थैला फेकणाऱ्याने गोप्य स्फोट केला की, या थैल्यात प्रेत आहे. जनतेतील लोकांनी या या प्रेत फेकणाऱ्या व्यक्तीला इतवारा पोलीसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळ पाहिले असता ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. जनतेने पकडलेला माणुस, त्याची दुचाकी ही सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक चव्हाण हे गोदावरी जीवरक्षक दलाच्या सदस्यांचे सहाय्य घेवून पाण्यात फेकलेले प्रेत शोधत आहेत. वृत्तलिहिपर्यंत प्रेत सापडले नव्हते. फेकणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या माहितीनुसार मरणाऱ्या व्यक्तीचा खून अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आणि आणि त्याचे प्रेत दुचाकीवर बांधून ्याने नांदेडला आणले आणि गोदावरी नदीत फेकले. मुळ खुनाची घटना अहमदपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या संदर्भाची माहिती अहमदपुर पोलीसांना दिली आहे. अहमदपुर पोलीस आल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्याकडे वर्ग केला जाईल. या संदर्भाची सविस्तर माहिती प्राप्त होणे शिल्लक आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकरी आणि मरणारे हे दोन्ही बिदर जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. मारेकऱ्याचे नाव आनंद संग्राम जोंधळे(45) रा.गांधीचौक बसवकल्याण जि.बिदर आणि मारून टाकलेल्या व्यक्तीचे नाव मोहन गुरूनाथराव नागवंशी (55) रा.गांधीचौक बसवकल्याण पण ह.मु.रुक्मीणीनगर थोरगाव रोड, अहमदपुर असे आहेत. अहमदपुरमध्ये मोहन नागवंशीचा खून करून त्याचे प्रेत नांदेडला आणून गोदावरी नदीत फेकले आहे. Kanthak Suryatal Post Views: 3,342 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणेशाचे आगमन