उदगिर (प्रतिनिधी)-आजच्या परिस्थितीत ध्यान साधनेची सर्वात जास्त आवश्यकता आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी उदगिर येथील बौध्द विहाराचे लोकार्पण करतांना केले.
उदगिर येथील बौध्द विहार राष्ट्रपतींच्या वेळी अभावी लोकार्पित झाले नव्हते. आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू नांदेड मार्गे उदगीरला आल्या आणि त्यांनी या बौध्द विहाराचे उद्घाटन केल्यानंतर त्या जनतेसमोर बोलत होत्या. या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.
सर्व प्रथम बौध्द विहाराचे उद्घाटन करून त्यांनी महिलांचा सन्मान या कार्यक्रमात सहभाग घेतला. बौध्द विहाराबद्दल बोलतांना राष्ट्रपती महामाहिम म्हणाल्या उदगिर येथील बुध्द विहारात एकाच वेळेस जवळपास 1000 व्यक्ती बसून ध्यान साधना करू शकतात. ध्यान साधनेचे महत्व भारतात सर्वात जास्त आहे आणि आजच्या परिस्थितीत सर्वांनाच ध्यान साधनेची गरज आहे.
पारदर्शक व जबाबदार काम करण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्न करत आहे. अनेक जागी त्यांना आर्थिक सहाय्यता दिली जात आहे. सर्व महिलांनी शिक्षणावर जास्त भर द्यावा. कारण एक महिला शिकली तर दोन कुटूंब आणि भविष्यातील पिढी साक्षर होत असते. या प्रसंगी श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करतांना महामाहीम यांनी छत्रपतीनी महिलांना दिलेल्या सन्मानाचा उल्लेख केला. बहिणाबाई चौधरी या महाराष्ट्र भुमीतील सुपूत्री आहेत. शिक्षण नसतांना सुध्दा त्यांनी भारतीय समाजाच्या रोजच्या जीवनातील परिस्थितीवर आधारीत केलेल्या कविता आज सुध्दा आम्ही ऐकतो आणि वाचतो. महामाहिम यांनी सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेख केला. अनेक अनाथांची माता झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्याकडून आम्हाला प्रेरणा घ्यायला हवी. राज्यातील सर्व नेत्यांना उल्लेखीत करून महामाहिम म्हणाल्या की, महिलांच्या क्षमता ओळखा आणि त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा. महिलांचा सन्मान करणे ही भारताची संस्कृती आहे. महिला आणि युवांचा विकास शिक्षीत भारत तयार करण्यात महत्वपुर्ण भुमिका पार पाडेल असे महामाहिम द्रोपदी मुर्मू म्हणाल्या. याप्रसंगी काही दिवसांतच सुरू होणाऱ्या श्री गणशोत्सव, गौरी आगमन या सणानिमित्त सर्वांना शुभकामना दिल्या.
राष्ट्रगिताने या कार्यक्रमाची सांगता झाली.