नांदेड(प्रतिनिधी)-दोन वेगवेगळ्या घरात झालेल्या चोरीचा एकच गुन्हा मुक्रमाबाद पोलीसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात 38 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. मौजे सुगाव (बु) ता.मुखेड येथील व्यंकट रघुनाथ बाजगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबरच्या रात्री कोणी तरी त्यांच्या घराचे चॅनलगेट तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील 20 तोळ्याचा चांदीचा दंडकडा व लाकडी पेटीत रोख रक्कम 15 हजार रुपये तसेच शेजारी राहणाऱ्या लक्ष्मीबाई गोविंद गवते यांच्या घरातील पत्राच्या पेटीतील 12 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी दोन ठिकाणी झालेल्या हा चोरीचा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(4) नुसार गुन्हा क्रमांक 194/2024 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख ताहेर हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,038 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर पोलीसांनी 20 हजारांची दारु आणि 3 लाख 30 हजारांची वाहने पकडली संशयीत तांदुळ स्वस्त धान्याचाच; कपील पोकर्णासह चार जणांवर गुन्हा दाखल