नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे ज्येष्ठ नागरीक कमलाबाई छगनसिंह भदौरिया यांचे आज निधन झाल्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी शांतीधाम स्मशानभुमी गोवर्धनघाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कमलाबाई भदौरिया या विक्रमसिंह,छायाचित्रकार करणसिंह पवनसिंह बैस , डॉ. अजितसिंह यांच्या त्या आजी आहेत. नांदेड येथील विजय फोटो स्टुडिओ येथे राहणाऱ्या कमलाबाई छगनसिंह भदौरिया (जवळपास 90) यांचे आज दि.25 ऑगस्ट रोजी दुपारी निधन झाले. त्यांचे निवासस्थान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या शेजारी येथून त्यांची अंतिमयात्रा निघाली आणि सायंकाळी सुर्यास्तापुर्वी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. कमलाबाई भदौरिया यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. विक्रमसिंह,प्रसारमाध्यमातील छायाचित्रकार करणसिंह पवनसिंह बैस, डॉ. अजितसिंह यांच्या त्या आजी आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,114 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा; शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा उपदेश नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात