नांदेड(प्रतिनिधी)-24 ऑगस्ट रोजी रात्री जेवन करून घराबाहेर पडलेल्याा एका युवकाला अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी डाव्या बाजूच्या छातीवर गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रकार आज सकाळी सुर्योदयासह समोर आला. नांदेड पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
रमेश नानासाहेब कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा चालक ओमकांत रमेश कोल्हे हा 24 ऑगस्ट रोजी रात्री जेवण करून आपले वडील रमेश कोल्हे यांचा मोबाईल घेवून बाहेर गेला पण तो परत आला नाही. 25 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेच्यासुमारास रमेश कोल्हे यांचा पुतण्या राम कोल्हे यांनी आपल्या आईला ओमकार हा जखमी अवस्थेत भायेगाव पाटीच्या बस स्टॉप पासून कॅनॉलकडे जाणाऱ्या भागात 50 मिटर दुर जखमी अवस्थेत पडलेला आहे. त्यांनतर सर्वच कोल्हे कुटूंबियांनी तिकडे धाव घेतली. दिसत्या परिस्थितीनुसार ओमकारच्या छातीवर डावीकडे धारधार हत्याराने मारल्याची जखम होती. त्याला दुचाकीवरुन शासकीय रुग्णालयात नेले असतांना डॉक्टरांनी तो येथे आणण्यापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. मरणारा ओमकार रमेश कोल्हे हा 27 वर्षीय युवक आहे.
घटनेची मााहिती मिळाताच पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार किरण उदावंत, विक्रम वाकडे, माधव माने आणि ज्ञानेश्र्वर कलंदर, मारोती पचलिंग तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. रमेश कोल्हे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द अज्ञात कारणासाठी ओमकार रमेश कोल्हेचा खून केला आहे असा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.