नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चे कलम 22-अ मध्ये विषद केलेल्या लोकोपयोगी सेवा जसे विद्युत, पाणी, गॅस इत्यादी संबंधी प्रकरणे तडजोडी करीता ठेवता येतात. या स्थायी लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत. संबंधीतांनी वरील ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्थायी लोक अदालती समक्ष आपली प्रकरणे ठेवून ती तडजोडीद्वारे मिटवून घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.
More Related Articles
जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले
नांदेड,(प्रतिनिधी)-आज चैत्र शुध्द नवमी अर्थात प्रभु श्री.रामचंद्रजींचा जन्मदिवस. हजारो वर्षांपासून हा दिवस कोणताही प्रचार न…
सा.बां.कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक करणार आत्मदहन
नांदेड(प्रतिनिधी)-जूना कौठा भागातील विकासनगर या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शासकीय काम करणाऱ्या गुत्तेदारांवर योग्य कार्यवाही झाली नाही…
निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले वृक्षारोपण
पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे केले आवाहन नांदेड- लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ.…