नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चे कलम 22-अ मध्ये विषद केलेल्या लोकोपयोगी सेवा जसे विद्युत, पाणी, गॅस इत्यादी संबंधी प्रकरणे तडजोडी करीता ठेवता येतात. या स्थायी लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत. संबंधीतांनी वरील ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्थायी लोक अदालती समक्ष आपली प्रकरणे ठेवून ती तडजोडीद्वारे मिटवून घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.
More Related Articles
सिडको गुरुवार बाजार येथील उद्यानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव द्यावे,मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नवीन नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको येथील गुरूवार बाजार परिसरा लगत असलेल्या मध्यवर्ती…
हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग
नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण…
भुखंडांचे श्रीखंड दाखवून 70 लाखांची गंडवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-कमी वेळात जास्त पैसे मिळविण्याचा नाद हा आजच्या युगातील सर्वात मोठा घातक विषय आहे. यातच…