भोकर :- जागतिक महिला दिन पासून गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी नांदेड जिल्ह्यात राहुल कर्डीले जिल्हाधिकारी नांदेड, मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉ. रेखा गायकवाड उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य), डॉ. शिवशक्ती पवार माता बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शना नुसार व डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. एचपीव्ही लसीकरण संदर्भात आज दि. १४ मार्च रोजी भोकर विधानसभा मतदारसंघाचे आ.श्रीजयाताई चव्हाण यांची भेट घेतली. एचपीव्ही लसीकरण बाबत डॉ.प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी माहिती दिली. या लसीबाबत काही समाज माध्यमाद्वारे खोटा व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केला जात आहे. नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत आरोग्य विभागाच्या माहितीस विश्वास ठेवावा. जगभरातील १६० देशांमध्ये एचपीव्ही लसीकरण सुरू असून भारत हा १६१ वा देश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालक व समाजातील सर्व घटकांची आवश्यकता आहे. आ.श्रीजयाताई चव्हाण यांनी एचपीव्ही लसीकरण वय वर्ष १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींनी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करणारा लवकरच व्हिडिओ संदेश देतो म्हूणन सांगितले. ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य सुविधा बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी स्वीय सहाय्यक एकनाथ खानसोळे साहेब, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रीनंदन पांचाळ उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 634 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘जुम्मा तुल विदा’ च्या दिवशी शुक्रवारी इराणने दाखवली आपली ताकत ३८ कोटींची तडजोड;राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली