नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. दि.21 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचाा गुन्हा क्रमांक 341/2024 दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर पोलीसांनी परिश्रम घेत 24 तासातच पकडले.शिवाजीनगर पोलीसांनी साहिल राजू गोडबोले(21) आणि अजय सुभाष पोहरे (27) या दोघांना पकडले. त्यांच्याकडे विचारपुस केले असतांना त्यांनी एकूण 6 दुचाकी गाड्या चोरी केल्याची माहिती दिली आणि पोलीसांनी त्या चोरीचा सहा दुचाकी गाड्या पंचासमक्ष जप्त केल्या. या सहा चोरीच्या दुचाकी गाड्यांची किंमत 3 लाख 60 हजार रुपये आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी चोरीच्या दुचाकी पकडणारे शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंधर तांदळे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर, राहुल लाठकर, दत्ता वडजे यांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,619 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्राचे सरकार गुन्हेगारांतर्फे उभे राहिले म्हणून उद्या महाराष्ट्र बंद-गिल नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी