नांदेड:- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 योजनेअंतर्गत 33 हजार 602 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 75 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केले नाही. त्यामुळे सदर शेतकरी अद्याप शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 892 तर एचडीएफसी बँकेचे 39 कर्जदार शेतकरी समाविष्ट आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 या योजनेचे ऑनलाईन पोर्टल ऑगस्ट अखेरपर्यंत चालु असुन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. तरी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,251 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार महाशिवपुरान कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी पर्यायी मार्ग वापरावे- पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार