नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील वसमतफाटा येथे असलेल्या एका हॉटेलमागे एका व्यक्तीवर दोन जणांनी हल्ला करून, त्याला जमखी करून त्याच्याकडील 8 हजार 600 रुपये लुटले आहेत. महाराष्ट्र हॉटेल वसमतफाटा येथे कार्यरत वैजनाथ किशनराव गोलतोंडे यांनी दि लेल्या तक्रारीनुसार शुभम कल्याणकर रा.अर्धापूर आणि त्याच्यासोबत एक अनोळखी माणुस हे दोघे 19 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजेच्यासुमारास हॉटेलमध्ये आले. त्यांना थंडपेय दिले नाही म्हणून त्यांनी वैजनाथ गोलकोंडे आणि हॉटेल मालकास लाथाबुक्यांनी मारहाण करून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. अनेक खाद्य पदार्थ फेकून दिले. त्यामुळे 30 हजारांचे नुकसान झाले. तसेच त्या दोघांनी हॉटेल मालकास हातावर हल्ला करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील 8 हजार 600 रुपये रोख रक्कम लुटून नेली आहे. अर्धापूर पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्रमांक 447/2024 प्रमाणे दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक भोसले हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,084 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे पत्रकार धनंजय सोळंके यांना राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान