नांदेड-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे 15 ऑगस्ट रोजी गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. पोस्टल सेव्हिंग बँक (POSB) सेवा, मेल डिलिव्हरी, आधार नोंदणी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) व्यवहार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) व्यवहार आणि पोस्टल लाइफ विमा ई. सेवा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या आठ डाक विभागातील 250 कर्मचारी व अधिकाऱ्यांचा पोस्टमास्टर जनरल अदनान अहमद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदरील कार्यक्रमात नांदेड डाक विभागातील 43 कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आलेला असून प्रशस्तीपत्र, चषक आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोस्टमास्टर जनरल श्री अदनान अहमद यांनी कौतुक करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. आपण केलेल्या कामाची वरिष्ठ कार्यालयाकडून दखल घेण्यात आल्यामुळे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,975 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी किरण पारधे यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड