नांदेड(प्रतिनिधी)- एका महिलेने आपले अनैतिक संबंध सुरू राहावेत या उद्देशाने त्या उद्देशात अडसळ ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याचाच खून केल्याचा प्रकार काळेश्र्वरनगर विष्णुपूरी येथे घडला आहे.
रेखासिंग भिमसिंग पुजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची सुनबाई (27) हिचे दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. या संदर्भाने त्यांचा मुलगा खेमसिंग आणि सूनबाई यांच्यात भांडणे होत होती. पण आपले अनैतिक संबंध सुरू राहावेत या उद्देशाने महिलेने 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर 12.30 वाजेच्यासुमारास आपला नवरा खेमसिंग रेखासिंग पुजारी याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून त्याचा खून केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 352, 351(2)(3) प्रमाणे गुन्हा क्रमांक 730/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांच्याकडे करण्यात आला. विजयकुमार कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेला त्वरीत अटक केली आणि आज स्वातंत्र्य दिनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या महिलेला 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.