नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने पोलीस अधिक्षक, पोलीस उपआयुक्त, अपर पोलीस अधिक्षक या पदाच्या 16 राज्यसेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोबतच एका पोलीस निरिक्षकाला पदोन्नती देवून त्यांना पोलीस उपअधिक्षक केले आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने राज्य सेवेतील 16 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. अधिकाऱ्यांची नविन नियुक्ती कंसात लिहिली आहे.
संदीप पालवे-पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर (पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड), संदीप भाजीभाकरे-पोलीस उपआयुक्त लोहमार्ग मुंबई(उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर), विवेक विठ्ठल मासाळ-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 गडचिरोली(पोलीस उपआयुक्त पुणे शहर), सचिन बाळासाहेब गुंजाळ-पोलीस उपआयुक्त ठाणे शहर(पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर), रोहिदास पवार-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण अमरावती(अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग नागपूर), विवेक पानसरे-पोलीस उपआयुक्त नवी मुंबई(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), रशमी नांदेडकर-उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर(पोलीस उपआयुक्त नवी मुंबई), प्रदीप चव्हाण-मुख्य सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), मिना मकवाणा-उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग छत्रपती संभाजीनगर(पोलीस उपआयुक्त ठाणे शहर), दत्ता किशन नलावडे-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई(पोलीस उपआयुक्त लोहमार्ग मुंबई), राजू भुजबळ-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई(मुख्य सुरक्षा अधिकारी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवायल मुंबई), रुपाली पोपटराव दरेकर-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण छत्रपती संभाजीनगर(पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर), अनिता दिलीपराव जमादार-पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर(पोलीस अधिकक्षक नागरी हक्क संरक्षण छत्रपती संभाजीनगर), लता पाटलोबा फड-पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे(उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग छत्रपती संभाजीनगर), विक्रांत विश्वास द ेशमुख-पोलीस उपआयुक्त पुणे शहर(पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे). या सर्वांसोबत पोलीस निरिक्षक अशोक किशनराव घुगे यांना पदोन्नती देवून पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणी या पदावर पाठविले आहे.