नांदेड(प्रतिनिधी)-कस्तुरबा प्राथमिक शाळा ताजनगर येथील मुख्याध्यापिका आपल्या कुटूंबासह जिल्हा परिषदेसह आमरण उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्याच हाताने त्यांचा बनावट राजीनामा तयार करून घेवून त्यांच्या जागी दुसऱ्या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.24 जुलैपासून आयशा मोमीन ईस्माईल या महिला जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आपल्या कुटूंबासह उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्या निवेदनाप्रमाणे संस्थेशी कसलाच संबंध नसणारी व्यक्ती युसूफ खॉ चॉंद खॉ पठाण यांनी खोट्या स्वाक्षऱ्या करून जयमाला पाटील यांची नियुक्ती केली आहे. याबाबत आता अध्यक्ष असलेले प्रभाकर निवृत्तीराव बंडगर यांनी पोलीस उपअधिक्षक वजिराबाद यांच्याकडे जबाब दिलेला आहे. मी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना विचारणा केली असता माजी संचिका मिळत नाही असे ते उत्तर देतात. ती चोरी गेली आहे आणि चोरीची तक्रार देण्यात आलेली आहे. मी मुख्याध्यापिका असतांना मिच माझ्या आदेशाने राजीनामा दिलेला आहे असे दाखवून माझ्यावर अन्याय करण्यात आला. तरी मला न्याय द्यावा या मागणीसाठी आयशा मोमीन ईस्माईल यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर कुटूंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे.