नांदेड व देवणी येथे मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 2.73 लाखांचा मुद्देमाल जप्त, 33 जणांवर गुन्हे नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहर व लातूर जिल्ह्यातील देवणी परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 94 हजार 760 रुपयांची रोकड, 16 मोबाईल व लॉटरी साहित्य असा 2 लाख 73 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 33 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड परिसरातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने ही कारवाई केली. 11 मार्च 2026 रोजी नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर चौकातील डांगे कॉम्प्लेक्स, सांगवी कॉम्प्लेक्स तसेच बोरगाव चौक या तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. येथे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर कारवाई करत 69,460 रुपयांची रोकड व 72 हजार रुपयांचे 7 मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी 20 आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच 10 मार्च 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील देवणी येथील बसस्थानकाजवळील डांगे कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट व बोरगाव चौक येथे ऑनलाइन लॉटरी मटका व्यवसायावर कारवाई करण्यात आली. यामध्ये 25,300 रुपयांची रोकड, 45 हजार रुपयांचे 9 मोबाईल व 61,700 रुपयांचे लॉटरी साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत 13 आरोपींना ताब्यात घेऊन देगवणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार प्रदीप खानसाळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा समावेश होता. दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नांदेड परिक्षेत्राच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच 91 50 100 100 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,323 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विभागात तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान बस रेड व रोड चेक्स – एका दिवसात 644 अनधिकृत प्रवाशांकडून ₹2.91 लाखांची वसुली डोनाल्ड ट्रम्प वार क्राईमचा गुन्हेगार