खोट्यांचा स्फोट: डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्य अमेरिकेच्या माध्यमांनीच उघडे पाडले;शाळेवर बॉम्ब, जगाला खोटं ; ट्रम्प यांचे भीषण सत्य बाहेर! मध्यपूर्वेत धगधगत असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचे खोटेपण अखेर जगासमोर उघडे पडले आहे. आणि हे खोटे उघड केले आहे त्यांच्या स्वतःच्या देशातील प्रसारमाध्यमांनी. त्यामुळे आधीच टीकेच्या भोवऱ्यात अडकलेले ट्रम्प आता आणखीच राजकीय संकटात सापडले आहेत. इतकेच नाही, तर हे प्रकरण पुढे जाऊन त्यांच्या सत्तेच्या खुर्चीलाही हादरा देऊ शकते. अमेरिकेतील जगप्रसिद्ध आणि प्रभावी वर्तमानपत्र The New York Times ने या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आणले आहे. इराणमधील मीना शहरात असलेल्या एका मुलींच्या प्राथमिक शाळेवर अमेरिकन क्षेपणास्त्रांचा मारा झाला आणि क्षणात सुमारे १६२ बालिका आणि काही शिक्षकांचा मृत्यू झाला—म्हणजे जवळपास १७० ते १७५ निष्पाप जीव निर्दयीपणे संपवले गेले. परंतु पत्रकार परिषदेत जेव्हा या हल्ल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ट्रम्प यांनी निर्लज्जपणे सरळ खोटे बोलले. “हा हल्ला आम्ही केलेलाच नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत; उलट हा हल्ला इराणने स्वतःच केला असा हास्यास्पद आणि दिशाभूल करणारा दावा त्यांनी केला. परंतु सत्य लपवून ठेवणे कायमचे शक्य नसते. The New York Times च्या सखोल चौकशीतून उघड झाले की हा हल्ला अमेरिकेच्या United States Central Command ने बहरीनमधील आपल्या लष्करी तळावरून केला होता. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps च्या नौदल मुख्यालयाचा परिसर असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु येथे अमेरिकन यंत्रणेची भयंकर बेफिकिरी समोर आली. हल्ल्यासाठी वापरलेला सॅटेलाइट नकाशा तब्बल १३ वर्षे जुना होता. या तेरा वर्षांत त्या परिसरात मोठे बदल झाले होते. २०१६ नंतर लष्करी परिसर आणि मुलींची शाळा यांच्यामध्ये मोठी भिंत उभारून दोन्ही जागा पूर्णपणे वेगळ्या करण्यात आल्या होत्या. पण अमेरिकन गुप्तचर संस्था आणि सैन्याने या बदलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणाम काय झाला? लष्करी तळ समजून जिथे क्षेपणास्त्र डागण्यात आले, तिथे प्रत्यक्षात निष्पाप मुलींची शाळा होती. क्षेपणास्त्रांचा वर्षाव झाला आणि शेकडो कुटुंबांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. वर्गात बसलेल्या निरपराध मुलींचे मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडले आणि जगभर संतापाची लाट उसळली. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्यालाही लगेच समजले की ही भयंकर चूक झाली आहे. ही माहिती ट्रम्प यांच्या कार्यालयालाही देण्यात आली होती. तरीसुद्धा पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी निर्लज्जपणे सर्व काही नाकारले. त्यांनी सरळ खोटे बोलत हा हल्ला आम्ही केला नाही असा कांगावा केला. यालाच आंतरराष्ट्रीय कायद्यात War Crime — युद्धातील गुन्हा म्हणतात. निरपराध नागरिकांवर, विशेषतः मुलांवर झालेला हल्ला हा मानवतेवरचा थेट आघात असतो. या प्रकरणात मात्र अमेरिकन पत्रकारितेने आपली प्रतिष्ठा राखली. The New York Times ने स्वतःच्या सरकारचे खोटे उघड करून दाखवले की खरी पत्रकारिता म्हणजे सत्तेची चापलुसी नाही, तर सत्तेला प्रश्न विचारणे. दुर्दैवाने अशी निर्भीड पत्रकारिता आज भारतात फार क्वचित दिसते. एकेकाळी सत्तेला जाब विचारणारी माध्यमे होती; पण गेल्या काही वर्षांत ती परंपरा कमकुवत होत चालली आहे हे वास्तव नाकारता येत नाही. या चुकीच्या हल्ल्यामुळे इराणच्या लष्करी तळाला फारसे नुकसान झाले नाही. पण ज्यांचा काहीही संबंध नव्हता त्या बालिकांचे जीव गेले. २८ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत अमेरिकेच्या अनेक एजन्सींना सत्य समजले होते की हा हल्ला चुकीच्या माहितीतून झाला आहे. तरीही ते सत्य दडपून ठेवण्यात आले. आता मात्र ते उघड झाल्याने अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे. इतिहास सांगतो अमेरिकन जनता अशा चुका सहज माफ करत नाही. माजी अध्यक्ष बाराक ओबामा यांच्या कार्यकाळातही इराक युद्धकैद्यांवरील अत्याचार उघड झाल्यानंतर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. तसाच दबाव आता ट्रम्प यांच्यावरही येऊ शकतो. कारण ही फक्त चूक नाही. ही मानवतेविरुद्धची चूक आहे. ही निष्पाप मुलांच्या रक्ताने लिहिलेली चूक आहे. आणि युद्धाच्या भाषेत याला एकच नाव आहे—युद्धातील गुन्हा. निरपराध बालिकांच्या मृत्यूने संपूर्ण जग हादरले आहे. त्या निष्पाप जीवांना आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. सोर्स …. Kanthak Suryatal Post Views: 778 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची कार्यवाही इराणची ‘मोजॅक रणनीती’ — अमेरिकेला अडकवणारी लढाई