नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करत दोन आरोपींना अटक करून १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(६), ३३३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी झोंटाबाई भिमनिकर इन्कर (वय ६०, रा. गंगावेट, ता. जि. नांदेड) यांनी तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास माणिकनगर शिवारात दोन अज्ञात इसमांनी तोंड बांधून फिर्यादीच्या शेतातील आवारात घुसून द्रौपदाबाई माणिकराव इनकर (वय ६५) व माणिकाबाई इनकर (वय ९०) यांना मारहाण करत हातातील कडे व पायातील चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यात अंदाजे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान जालना जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – रवी उर्फ मुंडल भास्कर शिंदे (वय २०, रा. विरेगाव, ता. जि. जालना) भास्कर सावळ्या शिंदे (वय ५५, रा. विरेगाव , ता. जि. जालना) आरोपींकडून ५० तोळे वजनाचे चांदीचे तोडे (अंदाजे किंमत ६०,००० रुपये) तसेच ४० तोळे वजनाच्या चांदीच्या पाटल्या (अंदाजे किंमत ५०,००० रुपये) असा एकूण १,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेककुमार कांबळे हे करत आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 763 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प मुदखेड पोलिसांची अवैद्य वाळू उपसा करण्याचे 80 लाखांचे साहित्य जिलेटीचा वापर करून नष्ट केले