नांदेड – जिल्हा परिषद, नांदेडचे सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पुंडलिकराव डोणेराव, वय 58 वर्षे, रा. नागसेन नगर, नांदेड यांचे आज गुरुवार 4 जुलै 2024 रोजी दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुरेश डोणेराव यांच्या पार्थिवावर, शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. बिलोली येथील आरोग्य केंद्रातून सुरेश डोणेराव नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. सुभेदार रामजी आंबेडकर सोसायटीचे सचिव होते. त्यासोबतच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. Kanthak Suryatal Post Views: 912 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पंचशिल नगरमधील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा -बंटी लांडगे नांदेड जिल्ह्यात जवळपास 12 पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या