नांदेड (प्रतिनिधि)-शहरातील पंचशिल नगरमध्ये पाईपलाईन खराब झाल्याने मागील 15 दिवसां पासून पाणीपुरवठा बंद आहे. येथील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानशाही शाळेच्या पाठीमागून पंचशिल नगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आहे. या ठिकाणी पाईप लाईनच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता त्यावेळेस पंचशिल नगरला पाणीपुरवठा करणारा पाईप फुटला परंतू मागील दहा दिवसापासून हा पाईप महापालिका कर्मचार्‍यांनी जोडला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचशिल नगरात पाणीटंचाई असल्याची तक्रार या भागातील माहिलांनी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्याकडे केली होती. लोकांच्या समस्येची तात्काळ दखल घेत बंटी लांडगे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदन देत पंचशिल नगरातील पाण्याची समस्या तात्काळ सोडवून या ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महापालिका आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. यावेळी सुमनबाई गोडबोले, जमनाबाई पवार, अरूणाबाई सुर्यवं, अरचना साटे, पारूबाई खाडे, अनुसयाबाई गोडबोले, बबीता पवार, पंचशिला नवघडे यांच्यासह आदी जणांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!