नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी येथे हॉटेलमधील एका आचाऱ्याने एका महिलेचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. चंद्रकांत उमेश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जूनच्या सायंकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान त्यांच्या घरी किरायाणे राहणारे कैलास डांबर यांनी आपली दुसरी पत्नी अर्चना कैलास डांबर (35) यांना किरकोळ कारणाच्या भांडणावरून बाजेचा माचवा उचलून तिच्या डोक्यात टाकला आणि तिचा खून केला. किनवट पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 152/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक दिनेश येवले अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील मारेकरी कैलास हा मुळ राजस्थान येथील रहिवासी आहे आणि बोधडीमध्ये आचारी म्हणून कार्यरत होता. Kanthak Suryatal Post Views: 1,481 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नखेगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेचा खूनच; महिला गर्भवती होती शेतात काम करणाऱ्या महिलेचे दागिणे लुटले