जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाय योजना कराव्यात-खा.वसंतराव चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यावरच जनावरांच्या चारा टंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यात सध्याा खरीप हंगाम असून बियाणे आणि रासायनिक खताच्या किंमती नियंत्रणाबाहेर गेल्याआहेत. यात राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करावे अशी मागणी नवनिर्वाचित खा.वसंत चव्हाण यांनी राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथील राजभवनात राज्यातील परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीत कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान, आ.मोहन हंबर्डे, आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अन्य कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थिती होते. यांनी नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई, दुष्काळ या परिस्थिती संदर्भाचा आढावा घेतला. याावेळी खा.वसंत चव्हाण यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपय योजना करण्यात याव्यात. यामध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई याचबरोबर शेतकऱ्यांना आद्यपही पिक विमा देण्यात आला नाही. तात्काळ विम विमा शासनाने द्यावे तसेच सध्या खरीप हंगामाचा मौसम सुरू असून कृषी व्यापाऱ्यांकडून कृत्रीत टंचाई तयार करून चढ्या दराने बि-बियाणे रासायनिक खते यांच्या किंमती नियंत्रणाबाहेर नेल्या जात आहेत. या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने आदेशित करावे व त्याची अंमलबजावणी करण्यात यावही अशी विनंती खा.वसंत चव्हाण यांनी राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनोज जरांगे यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष द्यावे
मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणा बसले आहेत. त्यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होवू शकतो. राज्यातील मराठा समाजाच्या भावना त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. यामुळे राज्य शासनाने वेळीच यात स्तक्षेप करून त्यांच्या मागण्यासंदर्भाने सकारात्मक विचार करावाा अशा स्वरुपाचाही एक निवेदन राज्यपाल महोदयांकडे कॉंगे्रस पक्षाच्यावतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *