डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा नांदेड :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी, ऑक्सीजन, सर्जिकल साहित्य तसेच किट्स व केमिकल्सकरीता लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी येथे विविध विषयांबाबत आढावा बैठक आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाची संवेदनशीलता लक्षात घेता रुग्णालय परीसरामध्ये पोलीस चौकी उभारण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला. नांदेड मनपाकडून रुग्णालयास नियमीतपणे पाणी पुरवठा करण्याबाबत, वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यानी राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रगतीपथावर असलेल्या बांधकामाचा आढावा घेवून बांधकामाची गती वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रुग्णालय संकुलातील अपघात विभाग, आय.सी.यु/एस.आय.सी.यु, लेबर रुम अशा विविध विभागांचा राऊंड घेतला. त्यामध्ये विविध विभागामधील कर्तव्यावरील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णालयामधील स्वच्छता, बाहयरुग्ण तसेच आंतरुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येमध्येमधील वाढ, रुग्णालय परीसरातील डुकरांचा नायनाट, इतर देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. Kanthak Suryatal Post Views: 919 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 10 लाख 61 हजारांचा चोरीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाने जप्त केला पशुधनाचे ईअर टॅगिंग 1 जूनपासून बंधनकारक