आमंत्रित टेबल टेनिस स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात आमंत्रित टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. विजेत्यांचा बक्षीस समारंभ पार पडल्याची माहिती जिल्हा क्रिडा कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
नांदेड जिल्हा क्रिडा कार्यालय आणि नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्यावतीने खुल्या आमंत्रित टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. 5 आणि 6 जून रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम परिसरातील इनडोअर संकुलात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, परभणी, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
जिल्हा क्रिडा अधिकारी जयकुमार टेंबरे, टेबील टेनीस स्पर्धेचे सचिव अश्र्विन बोरीकर, टेबल टेनीस प्रशिक्षक हनमंत नरवाडे, जमील, सचिन आठवले, श्रीकांत दुधारे, शंकर वडवळे, विश्र्वानाथ नांदेडे यांच्याहस्ते खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.
विजेत्यांमध्ये 11 वर्ष मुले प्रथम-निरज नांदेडे, द्वितीय-श्रेयश कदम आणि तृतीय सक्षम आठवले हे तिन्ही स्पर्धक नांदेडचे आहेत.
11 वर्ष मुली- प्रथम-शरयु दायडे (नांदेड), द्वितीय-जनिषा सेजवाल (छत्रपती संभाजीनगर), तृतीय-काव्या केदेकर(परभणी).
13 वर्ष मुले प्रथम- राज एंगडे(नांदेड)े, द्वितीय-श्रीपाद कोठेकर (परभणी), तृतीय-गौरव पत्तेवार (परभणी).
13 वर्ष मुली-प्रथम-शरयु दायडे (नांदेड), द्वितीय-जनिषा सेजवाल (छत्रपती संभाजीनगर), तृतीय-काव्या केदेकर(परभणी).
15 वर्ष मुले-प्रथम- राज एंगडे (नांदेड), द्वितीय-रुद्रा पाटील(परभणी), तृतीय-गौरव पत्तेवार(परभणी).
15 वर्ष मुली- प्रथम-शरयु दायडे (नांदेड), द्वितीय-जनिषा सेजवाल (छत्रपती संभाजीनगर), तृतीय-अक्षरा साखरे (नांदेड).
17 वर्ष मुले प्रथम-देवाशिष कदम (परभणी), द्वितीय-रुद्रा पाटील(परभणी), तृतीय-अर्थव गुर्जर (नांदेड),
15 वर्ष मुली-प्रथम -अक्षरा साखरे(नांदेड), द्वितीय- काव्या यादव(वर्धा).
19 वर्ष मुले-प्रथम- शिवनंद पुरी (परभणी), द्वितीय-देवाशिष कदम (परभणी), तृतीय-ओम तिवारी (वर्धा)
पुरूष एकेरी मुले-आयुष आठवले (नांदेड), द्वितीय-प्रसाद देशपांडे (यवतमाळ), तृतीय-सत्यम पेरके(नांदेड).
महिला एकेरी मुली-प्रथम-साक्षी देवकत्ते(परभणी), द्वितीय-श्रध्दा रावणगावकर(नांदेड), तृतीय-पुजा पाटील (नांदेड)
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रिडा अधिकारी संजय बेतीवार, बालाजी शिरसीकर, संजय चव्हाण, मोहन नायगावकर, चंद्रकांत गव्हाणे, सुभाष धोंगडे, सोनबा ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *