हदगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ करून गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 22 जुलै रोजी सोमवारी घडली. पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक व्हिडीओ केला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, माझ्यावर पोलीस उपनिरिक्षक बडीकर हे अन्याय करत आहेत आणि माझ्या आत्महत्येस बडीकर हे जबाबदार आहेत असा उल्लेख त्या व्हिडीओमध्ये केला आहे. गावातील एका घटनेची माहिती दिल्यानंतरही त्या संदर्भाची माहिती ते लपवत होते असे त्यांनी त्या व्हिडीओमध्ये सांगितले. मागील 15 दिवसापुर्वी गावातील एका व्यक्तीचा खून झाला होता. हा खून जातीयवादातून झाला असल्याची माहिती देण्यात आली. या बाबतची माहिती पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी लपवली असा पोलीसांचा समज होता.अन या बाबतची विचारणा पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारणा केली होती. पण आपल्यावर खोटा आरोप होत असल्याने आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत याबाबतची चौकशी होणार नाही. तोपर्यंत आम्ह पोलीस पाटील बालाजी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. याबाबतची सखोल चौकशी सुरू आहे. पण अद्यापही पोलीस दप्तरी या घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे हदगाव तालुकयात हळहळ व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,017 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सकल मराठा समाजाने जवळाबाजार जि.हिंगोली येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली आरएसएसमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सदस्य होवू शकतात