नांदेड (प्रतिनिधि)-मिर्झा अन्वर बेग पोलिस उप निरीक्षक (से.नि.) यांना राष्ट्रपती पदक ( राष्ट्रपती पुरस्कार) प्रदान करण्यात आले.
दिनांक 6 जून 2024 रोजी पोलीस उप निरीक्षक मिर्झा अन्वर बेग राहणार रहेमान नगर, इतवारा नांदेड यांना पोलीस विभागाचा सर्वोच्च पुरस्कार “राष्ट्रपती पोलीस पदक ( राष्ट्रपती पुरस्कार) दिनांक 6 जून 2024 रोजी राजभवन मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात महाराष्ट्र राज्यातील सर्व उच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महोदय यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक मिर्झा अन्वर बेग यांना सेवानिवृत्तीच्या काही महिने अगोदर 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांची योग्यता, कायदेशीर कामे व तपास कार्यातील कौशल्य तसेच त्यांनी सतत उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा पार पाडल्यामुळे त्यांची भारताचे माननीय राष्ट्रपती महोदय यांचेकडून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मिर्झा अन्वर बेग यांनी पोलीस खात्यात जवळपास ३८ (अठ्ठतीस) वर्षे विविध पदांवर सचोटीने आणि निस्वार्थीपणे उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड, पोलीस स्टेशन उमरी, महाराष्ट्र राज्य गुन्हे अ्वेषण विभागात (State C.I.D Crime मध्ये ) दीर्घ सेवा बजावली आहे. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील सेवा बजावली आहे. नांदेड जिल्ह्यात माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांचे वाचक पोलीस अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ ( माहे एप्रिल 2022 पर्यंत) कार्यरत होते. त्यांनी सतत कठोर परिश्रम घेऊन सचोटीने व निस्वार्थपणे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पोलीस विभागातील विविध क्षेत्रात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजवली आहे. या पूर्वीही, पोलीस उप निरीक्षक मिर्झा अन्वर बेग यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी 15 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे माननीय राष्ट्रपती महोदय यांचेकडून पदक (पुरस्कार) देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासाठी हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास भारताचे माननीय राष्ट्रपती महोदय यांचे कडून हा सर्वोच्च पुरस्कार दोनदा मिळणे ही एक मोठी उपलब्धी आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र आहे.