नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 27 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन बंटीभाऊ लांडगे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ लांडगे हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात. शहरातील विविध प्रभागात मित्रमंडळ व पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेत असतात. विविध जाती-धर्मांच्या लोकांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून अडचणीत येणार्या लोकांना ते नेहमीच सढळ हाताने मदत करत असतात. दि. 27 रोजी बंटीभाऊ लांडगे मित्रमंडळाच्यावतीने विष्णुपूरी येथे रूग्णालयात अन्नदान, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्याथ्यार्ंंना मोफत पुस्तके वाटप, शहरातील आयुर्वेदिक रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप, वृद्धाश्रमात मिठाई वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवून बंटीभाऊ लांडगे वाढदिवस साजरा होणार आहे, अशी माहिती बंटीभाऊ लांडगे मित्रमंडळाच्यावतीने देण्यात आली. Kanthak Suryatal Post Views: 1,816 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गोरठा येथे ४थे साहित्य संमेलन खुदा हाफिज प्रिन्स, जजाक अल्लाखैर; अशोकरावांसाठी सर्मपण