नांदेडच्या सेवा ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; ग्रुप संस्थापक अनुराधा वैजवाडे यांचा स्तुत्य उपक्रम

 

नांदेड- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड येथील सेवा ग्रुप, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या वतीने शहराच्या छत्रपती चौक परिसरात असलेल्या चतुर्थी रेस्टॉरंटजवळ दत्त मंदिर परिसरात कॅनल रोड वाडी बुद्रुक येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी सेवा ग्रुप संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा विष्णुकांत वैजवाडे यांनी पुढाकार घेतला होता.

नांदेड शहराच्या वाडी बुद्रुक परिसरातील छत्रपती चौक भागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सेवा ग्रुप आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे यात जांभूळ, लिंब, वड, पिंपळ, आवळा, गणेरी, आंबा, बेल, करंजी यासह आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी वन अधिकारी, सामाजिक वनीकरणाचे संदीप चव्हाण, शरयू रुद्रवार यांच्यासह वंदना आरमाळकर, वैष्णवी वैजवाडे यासोबतच ग्रुप सदस्य अर्चना आठवले, रागिनी महामुनी, लक्ष्मीबाई कोत्तावार, मनीषा रोडे, वर्षा ईठोलीकार, शैलजा पाठक, शोभा बच्चेवार, मिरा नरवाडे, लक्ष्मी जलदावार, सुशीला आल्लमवाड, सृष्टी महामुनी, अनुराधा डावकरे, अंजली विजापुरे, दत्त मंदिर ट्रस्टचे श्याम मंठाळकर, मंगला पाटील, अशोक जोशी, रमाकांत देशपांडे यांची उपस्थिती होती. तसेच वृक्षमित्र माधव सुवर्णकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला छत्रपती चौक परिसरातील अनेक वृक्ष मित्रांनी ही आपली उपस्थिती लावून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *