नांदेड(प्रतिनिधी)-सराहितपणे मोबाईल चोरी करून ते मोबाईल लोकांना विकणाऱ्या एका आरोपीला वजिराबाद पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्याआधारे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडील 13 मोबाईल जप्त केल्याची कार्यवाही वजिराबाद पोलीसांनी दि.4 जून रोजी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड शहरात वाढत्या मोबाईल चोरीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम यांच्या मार्गदर्शनात वजिराबाद पोलीस निक्षिरक्षक परमेश्र्वर कदम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्थानक परिसरात पाठविले. यावेळी या ठिकाणी असलेल्या पेट्रोलपंपाच्या शेजारी अरुण रामदास श्रीमंगले (36) रा.काबरानगर नांदेड हा व्यक्ती एका पिशवीमध्ये मोबाईल ठेवून कमी दरात नागरीकांना विकत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सदरील व्यक्तीस विचारणा केली असता त्यांच्याकडे संशयीतपणे 13 मोबाईल आढळून आले. अंदाजे 1 लाख 34 हजार किंमतीचे मोबाईल चोरी व गहाळ झालेले मोबाईल आढळून आले.सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 11/2024 दाखल करण्यात आला.