पत्रकार भूखंड घोटाळ्यात आणखी एका भूखंडाची विक्री;तेथे तयार होणार आता ‘तांडा’

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेची अर्थात नांदेडच्या जनतेची दोन एकर जागा हडपून त्यातून लाखों रुपये कमाई करणाऱ्या बेघर पत्रकारांपैकी एकाने नुकताच आपला भूखंड ‘ लाखो रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आता तेथे लवकरच ‘तांडा’ तयार होणार आहे.निगगठ्ठ मनपा प्रशाससाने बेघर पत्रकार सोसायटीला नोटीस देण्याचा नुसताच फार्स केला होता.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नांदेड शहरातील उत्तर भागात नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेची अर्थात नांदेडच्या जनतेची दोन एकर जमीन काही वर्षांपूर्वी बेघर आहोत असा हुंदका काही बोरू बहाद्दरांनी काही राजकीय पक्ष आणि प्रशासनिक अधिकाऱ्याकडे फोडून आपल्यासाठी हडप केली.त्यानंतर नांदेड शहरातील जमिनींचे दर गगनाला भिडले.त्यामुळे बेघर पत्रकारांचे डोळे पांढरे झाले आणि ‘कमाईचा चंग’ बांधलेल्या पत्रकारानी या जमिनीत तयार केलेल्या भूखंडाचा धंदा सुरु केला.हळू हळू या बेघर पत्रकारांचे भूखंड मोठमोठ्या गर्भ श्रीमंत लोकांनी खरेदी करण्याची सुरुवात केली.मग काही अर्जाचा धंदा करणाऱ्यांना जाग आली,काही नेत्यांना नांदेडच्या जनतेचे प्रेम उफाळून आले.पण ते सर्व प्रकार शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखेच ठरले.

या भूखंड घोटाळ्यातील प्रत्येक बेघर पत्रकार घरे असणारेच आहेत.त्यामुळे पत्रकार सोसायटीचा धंदा कारण्यामध्येच त्यांना रस होता वृत्तपत्र असो की पुस्तक यातून कमाईचा चंग बांधलेला पत्रकार या भूखंड घोटाळ्याचा म्होरक्या आहे.फक्त वास्तव न्यूज लाईव्हने बेघर पत्रकारांच्या या घोटाळ्याबाबत लिखाण केले आहे.पण निगरगट्ट मनपा प्रशासन मात्र फक्त देखावा करून गप्प बसले.नांदेडच्या नागरिकांच्या मालकीची जमीन खिरापती सारखी वाटून टाकणाऱ्या मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना थोडीशी लाज सुद्धा वाटली नाही.कमीत कमी ज्या कारणासाठी जागा देण्याचे नाटक दाखवण्यात आले ते नाटक तरी खरी आहे की नाही हे तरी मनपाच्या आजच्या प्रशासनाने पाहायला हवे.

मी नाही त्यातली असे नेहमी म्हणत मी पत्रकारांचा मोठा नेता आहे असे दाखवून अनेकदा अधिस्वीकृती समिती सदस्य पद मिळवणाऱ्या एका आदरणीय,सन्माननीय पत्रकाराने आपला भूखंड काही दिवसांपूर्वीच लाखोंच्या किमतीत विक्री केल्याचा प्रकार घडला आहे.आता बेघर पत्रकारांच्या घोटाळ्यातील भूखंड खरेदी करणार्याने तेथे ‘तांडा’ तयार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. वाह रे भारताची प्रगल्भ लोकशाही खऱ्या अर्थाने भारताची नव्हे महाराष्ट्राची नव्हेतर नांदेडची लोकशाही आता खऱ्या अर्थाने ‘डब्बर’ झाली आहे असे लिहिल्याशिवाय पर्याय शिल्लक नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *