नांदेड(प्रतिनिधी)-दोन दरोड्याच्या गुन्ह्यातील साहित्य आणि तो गुन्हा करण्यासााठी वापरलेल्या दुचाकी गाड्याा असा एकूण 10 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने जप्त करून चांगली कार्यवाही केल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड शहरातील इतवाराा उपविभागाच्या गुन्हे शोध पथकाने नागेश उर्फ लड्या उत्तमराव लडे (25) रा.मेंढला खुर्द ता.अर्धापूर, विशाल मधुकर डोलारकर(27) रा.लंगडीगल्ली अर्धापूर आणि गणेश मारोती घोरपडे(22) रा.मालेगाव ता.अर्धापूर या तिघांना पकडले त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या तिन गाड्या आणि 44 चोरीचे मोबाईल असा एकूण 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांनी अर्धापूर आणि बारड येथे दोन दरोडे टाकल्याचे गुन्हे निष्पन्न झाले आहेत. पोलीसांनी एकूण 11 आरोपी पकडले आहेत. त्यातील 6 आरोपी पोलीस ठाणे अर्धापूर आणि 5 पोलीस ठाणे बारड यांच्या ताब्यात दिले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदीनी इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सुशिलकुमार नायक, पोलीस अंमलदार अर्जून मुंडे, चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लूरोड आणि श्रीराम दासरे यांचे कौतुक केले आहे.