नांदेड-सोनखेड रस्त्यावरील निसर्ग धाब्यावर राडा ; 5 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेल मालकाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून त्या हॉटेलमधील कॅश बॉक्समध्ये असलेले 5 हजार रुपये तीन जणांनी बळजबरी काढून घेण्याचा प्रकार 20 मे च्या सायंकाळी घडला आहे.
हॉटेल चालक योगेश्र्वर काशीनाथराव मोरेे रा.सोनखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.20 मे रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान त्यांच्या मालकीचा निसर्ग धाबा येथे ते आणि त्यांचे मित्र बसलेले असतांना शुभम अनिलराव कदम (22) रा.जानापुरी जि.नांदेड, शिवा राजेश शिनगारे(25) रा.लेबर कॉलनी नांदेड, ज्ञानेश्र्वर उर्फ डॅनि अनिरुध्द गाडगे (22) रा.शेलगाव ता.अर्धापूर असे तिघे आले आणि जेवनाची मागणी केली. आज स्वयंपाकी नाही असे उत्तर दिल्यावर त्या तिघांनी लाकडाने योगेश्र्वर मोरेला मारहाण केली. त्यांना मारहाण होत असतांना त्यांच्या सोबतच्या लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला असता एकाच्या डोक्यात खंजीरने हल्ला करून जखमी केले आहे आणि निसर्ग धाब्याच्या कॅशबॉक्समधून 5 हजार रुपये बळजबरीने काढून नेले आहेत. सोनखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 नुसार गुन्हा क्रमांक 74/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *