नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्ती व्यक्तीची साखळी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या हातातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 2 तोळे सोन्याची चैन असा ऐवज लंपास केला आहे. हा प्रकार सकाळी 9.30 वाजता घडला असता शिवाजीनगर पोलीस ठाण्याने हा गुन्हा रात्री 10.42 वाजता दाखल केला आहे. देविदास हरीभाऊ साकळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.17 मे रोजी सकाळी 9.30 वाजता खुशी हॉस्पीटलसमोर गणेशनगर रस्त्यावर एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि मी पोलीस आहे असे सांगून त्यांच्या हातातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 15 हजार रुपये किंमतीची आणि दोन तोळे सोन्याची चैन किंमत 50 हजार रुपये असा 65 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी सुरूवातीला देविदास साकळकर यांना प्रतिसाद दिला नाही. पण रात्री उशीरा 10.42 वाजता हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 170 प्रमाणे क्रमांक 168/2024 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,207 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गहाळ झालेले 18 लाख 85 हजारांचे महागडे मोबाईल पोलीसांनी शोधले वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकाकडून चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या